उत्तरप्रदेशात सामूहिक बलात्काराची तक्रार करण्यास गेलेल्या पीडितेवर पोलीस ठाण्यात पुन्हा बलात्कार !
|
शाहजूहानपूर (उत्तरप्रदेश) – येथील जलालाबाद पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराची तक्रार करण्यास गेलेल्या मदनपूर भागातील एका ३५ वर्षीय महिलेवर पोलीस अधिकार्याने पुन्हा बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
(सौजन्य : TIMES NOW)
पीडित महिलेने पत्रकारांना सांगितले की, ३० नोव्हेंबर या दिवशी ती तिच्या घरी पायी निघाली होती. या वेळी रस्त्यात एक चारचाकी तिच्याजवळ येऊन थांबली. त्यानंतर यातील ५ जणांनी तिला बलपूर्वक त्यात बसवले आणि जवळच्या शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर पीडित महिला जलालाबाद पोलीस ठाण्यात गेली असता तेथे एक पोलीस उपनिरीक्षक उपस्थित होता. त्याने तिला त्याच्या खोलीत नेले आणि तिथे बलात्कार केला. त्यामुळे दोन्ही घटनांत तक्रार नोंदवली न गेल्याने तिने बरेलीचे साहाय्यक पोलीस महासंचालक अविनाश चंद्रा यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी चौकशीचा आदेश दिला.