३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांना निवेदन सादर
हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने समस्त हिंदुत्वनिष्ठांची मागणी
सातारा – नाताळ आणि ख्रिस्ती नववर्षारंभ निमित्ताने गड, किल्ले यांसारख्या ठिकाणी मद्य पार्ट्यांचे आयोजन केले जाते. हे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने सर्व हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने पोलीस आणि प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
या वेळी भाजपचे नगरसेवक विजयकुमार काटवटे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष अधिवक्ता दत्ताजी सणस, कार्यकारणी सदस्य उमेशजी गांधी, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री महेंद्र निकम, मंगेश निकम आदी मान्यवर उपस्थित होते.