मगो पक्षाच्या अध्यक्षपदासाठी जानेवारी २०२१ मध्ये निवडणूक
पणजी, २४ डिसेंबर (वार्ता.) – जानेवारी २०२१ मध्ये पक्षाचे अध्यक्षपद आणि समितीचे इतर सदस्य यांसाठीची निवडणूक घेण्यात येईल, अशी माहिती मगो पक्षाचे अध्यक्ष श्री. दीपक ढवळीकर यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘निवडणुकीसाठी कार्यक्रम ठरवण्यात आला आहे.
१६ जानेवारी २०२१ या दिवशी आम्ही पक्षाची सर्वसाधारण सभा बोलावणार आहोत. ही निवडणूक फेब्रुवारी २०२१ पर्यंत घ्या, असे निवडणूक आयोगाने आम्हाला सांगितले आहे. या सर्वसाधारण सभेसाठी ७०० ते ८०० सदस्य उपस्थित असतील. त्यांना मतदानाचा अधिकार असेल. या ८०० सदस्यांमधून निवडणुकीची प्रक्रिया करण्यात येईल. ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात येईल. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ७ आणि ८ जानेवारी असे २ दिवस स्वीकारण्यात येतील.’’