देहली विमानतळावरून खलिस्तानी आतंकवाद्याला अटक
अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) गेल्या काही वर्षांपासून पसार असणार्या खलिस्तानी आतंकवादी गुरजीतसिंह निज्जर याला देहली विमानतळावरून अटक केली. वर्ष २०१७ मध्ये निज्जर सायप्रस या देशामध्ये पळून गेला होता. तो परत भारतात येणार असल्याची माहिती मिळाल्यावर त्याला विमानाने येथे आल्यावर अटक करण्यात आली. तो मूळचा अमृतसरमधील पंडोरी येथील सुखासिंह गावातील रहिवासी आहे. फतेहगढ साहिब जिल्ह्यामध्ये आतंकवादी कारवायांसाठी हत्यारे पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याला आता मुंबईत आणण्यात येणार असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे. पुण्यामध्ये कट रचण्याच्या गुन्ह्यात निज्जर प्रमुख आरोपी आहे.
NIA arrests absconding Khalistani terrorist Gurjeet Singh Nijjar at Delhi airport upon his deportation from Cyprus: Official
— Press Trust of India (@PTI_News) December 23, 2020
१. निज्जर, हरपाल सिंह आणि मोइन खान हे सामाजिक माध्यमांतून ‘खलिस्तान’ नावाचा वेगळा देश निर्माण करण्यासाठी शीख तरुणांना भडकावण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी ते वर्ष १९८४ च्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री बियांत सिंह यांची हत्या करणार्या जगतरसिंह हावरा याची छायाचित्रे पोस्ट करून खलिस्तानला समर्थन देणारे लिखाण पोस्ट करायचे.
२. ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ या नावाने त्यांनी खलिस्तानसाठी पाठिंबा मिळवण्याच्या उद्देशाने एक संघटना स्थापन केली होती.
३. महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने वर्ष २०१८ मध्ये हरपाल सिंह याला अवैधरित्या शस्त्र बागळल्याच्या प्रकरणी अटक केली होती. नंतर मोइन खान याला बेंगळुरूमधून अटक केली. त्यानंतर त्यांना एन्.आय.ए.च्या कह्यात देण्यात आले.