ब्रिटनहून आलेले ५ कोरोनाबाधित प्रवासी विमानतळावरून पसार
अशा बेशिस्त नागरिकांवर उपचार केल्यानंतर त्यांना काही मांस कारागृहात डांबण्याची, तसेच त्यांच्यावर करण्यात आलेल्या उपचाराचा खर्च वसूल करण्याची शिक्षा केली पाहिजे !
नवी देहली – ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू सापडल्याने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे भारतासह अनेक देशांनी ब्रिटनसमवेतची विमान वाहतूक स्थगित केली आहे. त्यापूर्वी ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांपैकी ५ कोरोना पॉझिटिव्ह (सकारात्मक) रुग्णांनी देहली विमानतळावरूनच पलायन केल्याची घटना घडली.
ब्रिटनमधून येणार्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारने विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या प्रवाशांना कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. असे असले, तरी या ५ प्रवाशांनी विमानतळावर उतरल्यानंतर अधिकार्यांची दृष्टी चुकवून पळ काढला. याची माहिती मिळाल्यावर त्यांना शोध घेतलला असता त्यातील तिघांना रग्णालयात भरती करण्यात आले, तर अन्य दोघांपैकी एक आंध्रप्रदेशात, तर दुसरा पंजाबच्या लुधियानामध्ये पोचल्याची माहिती मिळाली. त्यांना तेथे अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.