ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नवीन ‘स्ट्रेन’च्या संक्रमणाविषयी ही सूत्रे लक्षात घ्या !
१. ब्रिटन हा आयुर्वेदानुसार ‘आनूप देश’ आहे. अशा ठिकाणी कफाचा प्रभाव आधिक्याने दिसतो. स्वाभाविकपणे कफाशी संबंधित विकार प्रबळ होतात. (आपल्याकडे गोवा, केरळ, बंगाल ही आनूप देशाची काही प्रमुख उदाहरणे)
२. जीवनशैली आणि खानपान ही महत्त्वपूर्ण सूत्रे दुर्लक्षित ठेवून चालणार नाही.
३. पूर्णतः पाश्चात्त्य वैद्यकावर असलेली भिस्त ही कोरोनाच्या काळात सर्व प्रगत राष्ट्रांना घातक ठरली आहे. हे त्याचेच उदाहरण आहे.
४. हा नवीन ‘स्ट्रेन’नसून ऑगस्टपासूनच अस्तित्वात असलेला स्ट्रेन आहे. आताच डोके वर काढण्यामागे पोषक वातावरण कारणीभूत असण्याची शक्यता अधिक आहे.
५. ‘बघा तिथे (ब्रिटनमध्ये) पुन्हा दळणवळणी बंदी लावावी लागली’ ही वाक्ये लसीकरणाच्या मार्केटिंगसाठी उत्तम आहेत. त्याने आपण घाबरून जाण्याची आवश्यक नाही.
६. आपण नेहमीप्रमाणेच नियमित व्यायाम, दुपारी न झोपणे, कफ वाढवणारे पदार्थ न खाणे किंवा कमीत कमी खाणे, आवश्यकता वाटताच वेळ न दवडता जवळच्या वैद्यांना भेटणे या मार्गाने पुढे जात राहूया !
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति