डुकराचा अंश असलेल्या कोरोना लसीला ‘संयुक्त अरब अमिरात फतवा परिषदे’ची मान्यता
भारतातील मुसलमानही यानुसार वागतील, अशी अपेक्षा !
अबुधाबी (संयुक्त अरब अमिरात) – कोरोना लसीमध्ये डुकराचा अंश असल्याने मुसलमानांकडून त्यावर बहिष्कार घालण्याची मागणी होत असतांना संयुक्त अरब अमिरातमधील सर्वोच्च इस्लामी संस्था ‘संयुक्त अरब अमिरात फतवा परिषदे’ने कोरोना लसीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय देतांना ‘कोरोना लसीमध्ये डुकराचा अंश वापरला असला, तरी मुसलमानांनी त्या लसीचे डोस घेण्यास काही हरकत नाही’, असे म्हटले आहे. डुकराशी संबंधित उत्पादनांच्या वापराला मुसलमानांमध्ये ‘हराम’ समजले जाते. लस निर्मितीमध्ये पोर्क जिलेटीन (डुकराचा अंश) हा घटक वापरला जातो.
UAE Islamic body approves Covid-19 vaccines even with porkhttps://t.co/11VDv6Eh1P
— Hindustan Times (@HindustanTimes) December 23, 2020
परिषदेचे अध्यक्ष शेख अब्दुल्ला बिन म्हणाले की, कुठलाही अन्य पर्याय उपलब्ध नसेल आणि या घडीला मानवी शरिराचे संरक्षण करणे अधिक महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या विषयात ‘पोर्क जिलेटीन’कडे अन्न म्हणून नव्हे, तर औषध म्हणून पाहिले जात आहे.