बंगालमधील मुसलमानबहुल भागात हिंदूंना मतदान करण्यापासून रोखले जाते ! – सर्वोच्च न्यायालयात याचिका

  • न्यायालयात अशी याचिका करावी लागते, हे बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार आणि निवडणूक आयोग यांना लज्जास्पद !
  • केवळ बंगालमध्येच नव्हे, तर देशातील अन्य राज्यांतील मुसलमानबहुल भागात असे होते का ? याची माहिती आता निवडणूक आयोगाने आणि तेथील सरकारने घेतली पाहिजे आणि जर असे होत असेल, तर तेथे हिंदूंना संरक्षण देत त्यांना मतदान करू दिले पाहिजे !

नवी देहली – पुढील वर्षी बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. याविषयी सर्वोच्च न्यायालयात पुनीत कौर ढांडा यांनी याचिका प्रविष्ट करून मतदार सूचीतून बोगस मतदारांची नावे हटवण्याची मागणी केली आहे. तसेच राज्यात मुसलमानबहुल मालदा, उत्तर दिनाजपूर, मुर्शिदाबाद, नादिया, कूचबिहार, कोलकाता, उत्तर २४ परगणा आणि दक्षिण परगणा या भागांत हिंदूंना मतदान करू दिले जात नाही. तेथे त्यांना मतदान करण्यास अडथळा निर्माण केला जातो. हा अडथळा दूर करण्यात यावा, अशी मागणीही केली आहे.

भाजप कार्यकर्त्यांवरील हल्लीच्या काळात झालेले पश्चिम बंगालमधील हल्ले

ढांडा यांनी याचिकेत म्हटले आहे की,

१. न्यायालयाने निवडणूक आयोगाला सांगावे की, बंगालमध्ये बोगस मतदारांविषयी अहवाल सादर करावा.

२. बंगालमध्ये विरोधी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या हत्या होत आहेत. या प्रकरणांची सीबीआय चौकशी करण्यात यावी.

३. राज्यात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या सर्वाधिक हत्या झाल्या आहेत. सत्ताधारी पक्ष याविषयी कोणतेही कठोर पाऊल उचलत नाही. महिला नेत्यांच्याही हत्या झाल्या आहेत. राज्यात मानवाधिकारांचेही हनन होत आहे. या स्थितीमुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांना संरक्षण देण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.