निधन वार्ता
संभाजीनगर – येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. अक्षरा दिनेश बाबते यांच्या आई तसेच श्री. दिनेश बाबते यांच्या सासूबाई श्रीमती आशा मुरलीधरराव भेडसूरकर (वय ७७ वर्षे) यांचे परभणी येथे वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्या माजी मुख्याध्यापिका आणि गीतेच्या गाढ्या अभ्यासक होत्या. त्यांच्या पश्चात २ मुले, २ सुना, २ मुली, २ जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार बाबते आणि भेडसूरकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहेत.