भिवंडी येथून १ कोटी १३ लाख ७९ सहस्र रुपयांच्या अमली पदार्थांचा साठा हस्तगत
दोघांना अटक
ठाणे – ब्राऊन शुगरसह अमली पदार्थांची तस्करी करणारे जाहीद शेख (वय ३० वर्षे) आणि ईश्वर मिश्रा (वय ३९ वर्षे) यांना भिवंडी पिसे रस्त्यावरील सावद येथून ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १ कोटी १३ लाख ७९ सहस्र रुपयांची ब्राऊन शुगर आणि एम्डी पावडर हस्तगत केली आहे.