सिंधुदुर्गातील कोरोनाची सद्य:स्थिती
१. गत २४ घंट्यांतील नवीन रुग्ण १०
२. आतापर्यंत बरे झालेले रुग्ण ५ सहस्र २७८
३. आतापर्यंतचे एकूण रुग्ण ५ सहस्र ७९०
४. उपचार चालू असलेले रुग्ण ३५५
५. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १५१
भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार कोरोनाबाधित
भाजपचे प्रदेश चिटणीस माजी आमदार प्रमोद जठार, त्यांचा वाहनचालक आणि अन्य एक अशा तिघांचा कोरोनाविषयीचा अहवाल सकारात्मक आला आहे. जठार हे त्यांच्या कासार्डे येथील घरी गृहअलगीकरणात आहेत. अहवाल सकारात्मक आल्यानंतर जठार यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाविषयीची चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. मालवण नगरपरिषदेच्या एका नगरसेवकालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.