गोव्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा १ सहस्र
पणजी – गोव्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण १ सहस्रहून अल्प झाले होते. ही संख्या २३ डिसेंबरला १२५ नवीन कोरोनाबाधित आढळल्याने पुन्हा १ सहस्र झाली आहे. कोरोनामुळे दिवसभरात २ मृत्यू झाले आहेत, तर ७० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंतचे एकूण मृत्यू ७२७ झाले आहेत. आतापर्यंतची एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५० सहस्र ३६४ झाली आहे.