फोंडा पालिकेचे नगरसेवक व्यंकटेश नाईक यांची भाजपला सोडचिठ्ठी
फोंडा, २३ डिसेंबर (वार्ता.) – फोंडा नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक यांनी भाजपला सोठचिठ्ठी दिली आहे. नगरसेवक व्यंकटेश नाईक यांनी फोंडा भाजप मंडळ समितीच्या सदस्यत्वाचेही त्यागपत्र दिले आहे. नगरसेवक व्यंकटेश नाईक म्हणाले, ‘‘भाजपचे स्थानिक स्तरावरील कार्य योग्य चाललेले नाही.’’ नगरसेवक व्यंकटेश नाईक हे ‘गोवा फॉरवर्ड’मध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.