अंबरनाथ नगरपरिषदेच्या कर निरीक्षकाला लाच घेतांना अटक
ठाणे, २३ डिसेंबर (वार्ता.) – अंबरनाथ येथील एका घराला कर लावण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेच्या कर विभागातील कर निरीक्षक देवसिंग पाटील यांनी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराकडून तडजोडीअंती ठरलेली ५ सहस्र ६०० रुपयांची लाच घेतांना पाटील यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा करायला हवी. – संपादक)