तलवारीने केक कापून त्याचे छायाचित्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी तिघांना अटक
जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) – २१ डिसेंबर या दिवशी राहुल कांबळे, राहुल पवार, फकीरचंद पाथरवट आणि त्यांचे १५ साथीदार यांनी झोपडपट्टी परिसरात वाढदिवस साजरा केला. या वेळी त्यांनी तलवारीने केक कापला आणि त्याचे छायाचित्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून जनतेमध्ये त्यांची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट लक्षात येताच पोलिसांनी वरील तिघांवर अवैध शस्त्रे बाळगून समाजात दहशत माजवणे, तलवारीने केक कापून वाढदिवस साजरे करत सर्वसामान्य लोकांना दादागिरी करून त्यांच्याकडून पैसे उकळणे अशा प्रकारचे गुन्हे नोंद करून अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ अधिक अन्वेषण करत आहेत. (अलीकडच्या काळात तलवारीने केक कापण्यासारखी बीभत्स कृती तरुणांमध्ये फोफावत आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आणि कायद्याचा धाक नसल्याने केक कापणे, तसेच तो तलवारीने कापणे आणि त्याची छायाचित्रे प्रसारित करणे अशा कृती करण्यास युवक धजावत आहेत ! – संपादक)