लाच मागितल्याप्रकरणी हिंगोली जिल्ह्यातील तलाठी आणि कोतवाल कह्यात
भ्रष्टाचाराने पोखरलेले महसूल खाते !
हिंगोली – जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील हातमाली येथे शेतभूमीच्या फेरफारमध्ये दुरुस्ती करण्यासाठी ५ सहस्र रुपयांची लाच मागणारे सेलसुरा सज्जा येथील तलाठी बेले आणि कळमनुरी तहसील कार्यालयातील कोतवाल शेख हमीद या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २१ डिसेंबरच्या रात्री उशिरा कह्यात घेतले. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा येथील राजेंद्र भोयर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.