मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांना मानवाधिकार आयोगाकडून नोटीस
अभिनेत्री कंगना राणावत यांच्या कार्यालयावरील कारवाईचे प्रकरण
मुंबई – अभिनेत्री कंगना राणावत यांच्या कार्यालयाचे बांधकाम अनधिकृत ठरवून ते तोडल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. ९ सप्टेंबर या दिवशी महानगरपालिकेकडून कंगना राणावत यांच्या कार्यालयाचा काही भाग अनधिकृत ठरवून ‘बुलडोझर’ने पाडण्यात आला. या प्रकरणी कंगना यांनी सर्वाेच्च न्यायालयात याचिका करून महानगरपालिकेकडून हानीभरपाईची मागणी केली. न्यायालयाने या कारवाईला अवैध ठरवले आहे.