जालना येथील हुतात्मा सैनिक गणेश गावंडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
जालना – पुणे येथे २१ डिसेंबर या दिवशी सकाळी १० वाजता कर्तव्य बजावत असतांना सैनिक गणेश संतोषराव गावंडे (वय ३८ वर्षे) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. भोकरदन तालुक्यातील भिवपूर या गावी त्यांच्या पार्थिवावर २३ डिसेंबर या दिवशी सकाळी १० वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुले आणि ४ भाऊ असा परिवार आहे. ते सैन्यदलात मराठा बटालियनमध्ये वर्ष २००५ मध्ये रूजू झाले होते.