मनसेचे पदाधिकारी लाच स्वीकारतांना पोलिसांच्या कह्यात !

इतर ४ साथीदारांविरोधात गुन्हा नोंद

चिंचवड – येथील एम्.आय.डी.सी. मधील ‘स्टार इंजिनियर्स इंडिया प्रा. लि.’ या आस्थापनामुळे प्रदूषण होत असल्याची तक्रार मनसे अधिकारी कैलास नरके यांनी वाकडेवाडी येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कार्यालयात दिली होती. तक्रार मागे घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे रिजनल ऑफिस डॉ. संघेवार यांच्या वतीने कैलास याने २० लाख रुपयांची मागणी केली. त्यातील काही रक्कम (एक लाख रुपये) टोकन म्हणून स्वीकारतांना पोलिसांनी नरके याला कह्यात घेतले, तर इतर ४ जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.