महिला पोलीस शिपायावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलीस शिपायाला अटक
रक्षक नव्हे, भक्षक पोलीस !
सासाराम (बिहार) – येथे राजीव कुमार या पोलीस शिपायाने एका महिला पोलीस शिपायावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी राजीव कुमार याला अटक केली आहे. या पीडित महिला पोलीस शिपायाचा पतीही पोलीस असून त्याने केलेल्या तक्रारीनंतर राजीव कुमार याला अटक करण्यात आली.
बिहार पुलिस के एक सिपाही को एक महिला पुलिसकर्मी के साथ बलात्कार के आरोप में गिरफ्तार किया गया#Bihar | @rohit_manas https://t.co/4XwQCYKkZX
— AajTak (@aajtak) December 23, 2020
काही दिवसांपूर्वी या महिला पोलिसांची नियुक्ती पाटलीपुत्र येथील गर्दनीबाग परिसरात होती. त्या वेळी आरोपी राजीव कुमार याने तिला एका हॉटेलमध्ये बोलावले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. हे दोघे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत आहेत.