‘ऑनलाईन’ २० व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे २५ डिसेंबरला उद्घाटन !
पुणे – साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने या वर्षी २५ आणि २६ डिसेंबर या दिवशी २० व्या संमेलनाचे आयोजन केलेले असून या संमेलनाचा उद्घाटन सोहळा २५ डिसेंबर या दिवशी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. सर्व कार्यक्रम ‘ऑनलाईन’ होणार असून फक्त दोन कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये असतील, असे संमेलनाचे स्वागत अध्यक्ष श्री. दिलीप बराटे यांनी सांगितले.
यामध्ये रसिकांना परिसंवाद, कथाकथन, कवी संमेलन अशा कार्यक्रमांचा आस्वाद घरबसल्या यू ट्यूब, फेसबूक आणि इंस्टाग्राम या प्रणालीवरून घेता येईल.