५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना वीज वितरण आस्थापनाचे कनिष्ठ अभियंता अटकेत
भ्रष्टाचारग्रस्त भारत
कोल्हापूर – विद्युत् जोडणीचे मीटर बसवल्याचे बक्षीस म्हणून ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना महाराष्ट्र राज्य विद्युत् महावितरण आस्थापनेचे कनिष्ठ अभियंता अमोल बाळासो कणसे आणि सरकारी ठेकेदार हारुण लाटकर यांना कबनूर (तालुका हातकणंगले) येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.