लहान मुलीवर अत्याचार करणार्या धर्मांधावर कठोर कारवाई करा ! – बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांची हातकणंगले पोलीस ठाण्यात मागणी
हातकणंगले (जिल्हा कोल्हापूर) – सहारानगर, रुई येथे एका लहान मुलीवर धर्मांधाने अत्याचार केला. या प्रकरणी धर्मांधावर कोणता गुन्हा नोंद केला, पुढील कार्यवाही काय करणार ? असे प्रश्न उपस्थित करून लहान मुलीवर अत्याचार करणार्या धर्मांधावर कठोर कारवाई करा, अशी मागणी बजरंग दल, विश्व हिंदु परिषद यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक भवड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली. या वेळी पोलीस निरीक्षकांनी कारवाईचे आश्वासन देत लवकरच योग्य ती कारवाई करू, असे सांगितले.
या वेळी बजरंग दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. पंढरीनाथ ठाणेकर, बजरंग दलाचे संयोजक श्री. संतोष हत्तीकर, विश्व हिंदु परिषद शहर मंत्री श्री. प्रवीण सामंत, शहर उपाध्यक्ष श्री. संतोष मुरदुंडे, सर्वश्री दत्ता पाटील, महेश कोरवी, रणजीत पवार, बाळासाहेब कामत यांसह अन्य उपस्थित होते.