ओढ्यावरील रेणुकादेवीची आंबील यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रहित
कोल्हापूर – येथील ओढ्यावरील रेणुकादेवीची आंबील यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रहित करण्यात आली आहे. गेल्या १०० वर्षांत पहिल्यांदाच कोरोनामुळे यात्रा रहित करावी लागली असून भाविकांनी ३० जानेवारीपर्यंत गर्दी न करता देवीला नेवैद्य अर्पण करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार यात्रा रहित करण्यात आली असली, तरी २९ डिसेंबरला परंपरेप्रमाणे ओढ्यावरील मंदिरात कंकण विमोचन सोहळा होणार आहे. सकाळी अभिषेक, अलंकार पूजा, आरती आणि रात्री ९ नंतर पालखी सोहळा होणार आहे. सध्या मंदिरात कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करत दर्शन दिले जात आहे.