काश्मीरमध्ये भाजप प्रथमच जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत ३ जागांवर विजयी, तर ५४ ठिकाणी घेतली आघाडी !
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत भाजपला प्रथमच ३ जागांवर विजय मिळाला आहे, तसेच यात ५४ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर गुपकर आघाडीचे उमेदवार ९५ जागांवर आघाडीवर आहेत. गुपकर आघाडीमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पीपल्स कॉन्फरन्स, आवामी नॅशनल कॉन्फरन्स, जम्मू काश्मीर पीपल्स मूव्हमेंट, कम्युनिस्ट पक्ष या पक्षांचा समावेश आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेसाठी २८० जागांसाठी एकूण ८ टप्प्यांमध्ये मतदान झाले आहे. या निवडणुकीत एकूण २ सहस्र १७८ उमेदवार उभे होते.