भाजपचे नगरसेवक दया शंकर यांची नागपूर येथील महापौरपदी वर्णी
नागपूर – येथील महापौर संदीप जोशी आणि उपमहापौर मनीषा कोठे यांनी कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे पदाचे त्यागपत्र दिले आहे. महापौरपद ठरल्याप्रमाणे १३-१३ मासांसाठी संदीप जोशी आणि दया शंकर तिवारी यांना वाटून देण्यात आले होते. त्यांपैकी जोशी यांचा पहिला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर शहराचे नवे महापौर म्हणून भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दया शंकर तिवारी असणार आहेत. ‘१३ मासांपैकी १० मास कोरोनाकाळात गेली असल्याने बरेचसे लोकहिताचे काम पूर्ण करण्याची फारशी संधीच मिळाली नाही’, असे मत मावळते महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केले.