जमावबंदी असतांना मिरवणूक काढल्याने सातारा येथील भाजप सरपंचांसह ५२ जणांवर गुन्हा नोंद
सरपंचच नियमांचे पालन करत नसतील, तर ते समाजाकडून नियमांचे पालन कसे करून घेतील ? नियम मोडणारे नाही, तर नियमांचे पालन करणारेच लोकप्रतिनिधी हवेत !
सातारा – शिरवळच्या विशेष ग्रामसभेत सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव टळल्यानंतर जिल्ह्यात जमावबंदी असतांना त्यांच्या समर्थकांनी विजयी मिरवणूक काढली.
(सौजन्य : TV9 Marathi)
सरपंच पानसरे यांनाही शिरवळ पोलिसांनी त्याविषयी नोटीस काढून बजावले होते. तरीही विजयी मिरवणूक निघाल्याने शिरवळ पोलीस ठाण्यात सरपंच यांच्यासह अनुमाने ५२ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.