उत्तरप्रदेश सरकार राज्यात १२० नव्या गोशाळा उभारणार

सरकारने केवळ नव्या गोशाळा उभारू नयेत, तर राज्यात आतापर्यंत अस्तित्वात असणार्‍या गोशाळांची स्थिती अधिक कशी चांगली होईल आणि तेथील गायी सुरक्षित कशा रहातील, याकडेही लक्ष दिले पाहिजे !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश सरकारने राज्याचे मुख्य सचिव आर्.के. तिवारी यांना राज्यात गोशाळा उभारण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून नवीन प्रस्ताव मागवण्याचा आदेश दिला आहे. एकूण १२० गोशाळा उभारण्याचा प्रस्ताव असून यासाठी १४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तसेच आवश्यकता वाटल्यास वित्त आयोगाच्या अर्थसंकल्पातून गायींच्या देखभालीसाठी गोसेवक ठेवण्यात येतील, असेही या आदेशात म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वाड्रा यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून अनेक ठिकाणी थंडीमुळे गायींचा मृत्यू होत असल्याचे सांगत गोशाळांची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. त्यानंतर सरकारने हा आदेश दिला आहे.