सांगली येथील जिज्ञासूंसाठी सत्संग सोहळा पार पडला
सांगली, २२ डिसेंबर (वार्ता.) – जिल्ह्यात गेले ८ मास सनातन संस्थेच्या माध्यमातून विविध साधना सत्संग घेतले जात आहेत. या सत्संगांच्या माध्यमातून जोडलेल्या जिज्ञासूंना साधनेची पुढची दिशा मिळावी, यासाठी १९ डिसेंबर या दिवशी एका ऑनलाईन सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सत्संग सोहळ्यात सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. या सोहळ्यासाठी १२५ जणांची उपस्थिती होती.
प्रारंभी सत्संग सोहळ्याचा उद्देश सनातन संस्थेच्या साधिका सौ. विनया चव्हाण यांनी सांगितला, तर सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांच्या अद्वितीय कार्याचा परिचय वैद्या (कु.) शिल्पा बर्गे यांनी करून दिला. साधनेला प्रारंभ केल्यावर आलेले अनुभव जिज्ञासूंनी सांगितले.