वणी (यवतमाळ) येथील भालर शिवारात वाघांची दहशत
प्रशासनाने तातडीने उपाययोजना काढून गावकर्यांना वाघांच्या दहशतीपासून मुक्त करावे !
वणी (यवतमाळ), २२ डिसेंबर (वार्ता.) – वणीजवळील ५ कि.मी. अंतरावरील भालर शिवारात वाघाने २ जनावरे ठार केल्याने शेतकरी, शेतमजूर आणि गावकरी यांच्यामध्ये वाघाची दहशत पुष्कळ वाढली आहे. ‘वनपरिक्षेत्राधिकारी यांनी वाघावर नियंत्रण आणावे’, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. तेथे ३ बछड्यांसमवेत असणारी एक वाघीण पुष्कळ आक्रमक आहे, अशी चर्चा आहे.