पाक सरकारकडून राजधानी इस्लामाबादमध्ये हिंदु मंदिर उभारण्याला अनुमती
पाक सरकारने केवळ अनुमती देऊन थांबू नये, तर त्याचे बांधकाम करतांना आणि मंदिर उभारल्यावरही त्या रक्षणासाठी कायमस्वरूपी सशस्त्र बंदोबस्त करावा, असेच हिंदूंना वाटते !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाक सरकारने येथे बांधण्यात येणार्या हिंदु मंदिराला अनुमती दिली आहे. ६ मासांपूर्वी या मंदिराचे काम धर्मांधांच्या दबावामुळे थांबले होते. तसेच धर्मांध धर्मगुरूंनी मंदिराला अनुमती देण्यात येऊ नये, अशी चेतावणीही सरकारला दिली होती. कॅपिटल डेव्हलपमेंट अथॉरिटीने (सी.डी.ए.ने) ने लाहोरमध्ये एक अधिसूचना जारी करत याला अनुमती दिली आहे.
(सौजन्य : Voices of South Asia)
Permission has been granted for the construction of a Hindu temple in #Islamabad by the #Pakistan government.https://t.co/8ctIJ5Qjiq
— IndiaToday (@IndiaToday) December 22, 2020
येथे २० सहस्र चौरस फूट जागेत श्रीकृष्ण मंदिर उभारण्यात येणार आहे, तसेच येथे स्मशानभूमीही बांधण्यात येणार आहे. पाकमध्ये सध्या ९० लाख हिंदू आहेत. यातील बहुतेक हिंदू सिंध प्रांतात रहातात.