शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने ठिकाठिकाणी शिवप्रतापाचा जागर !
कोल्हापूर – मार्गशीर्ष शुक्ल पक्ष ७ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध केला. याला २१ डिसेंबर या दिवशी ३५२ वर्षे पूर्ण झाली. हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून ओळखला जातो. या दिनाच्या निमित्ताने शिवप्रेमींनी ठिकठिकाणी शिवप्रतापाचा जागर केला.
१. करवीर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. या वेळी तेथील परिसर आकर्षक रांगोळ्या आणि फुले यांनी सजवण्यात आला होता.
२. शिवसेना ग्राहक संरक्षक कक्ष जिल्हाप्रमुख दीपक यादव, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख श्री. संजय पोवार, सर्वश्री आप्पासाहेब चव्हाण, शंकर अर्जुन, रंजित पुजारी, भरत यादव, गजानन यादव, मोटू यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण केला.
३. शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगाव, बेलवळे, कागल, मुरुगड यांसह अन्य ठिकाणी शिवप्रताप दिवस साजरा करण्यात आला.
४. हुपरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी सर्वश्री संदीपजी महिंदगुरुजी, रावसाहेब ढेंगे, राजेश भोजे, नीळकंठ माने, शिवदास माने उपस्थित होते.
५. कोल्हापूर – सेवाव्रत प्रतिष्ठान आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. या वेळी मिरज येथील गोप्रेमी आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. विनायक माईणकर यांच्या हस्ते शिवप्रतिमा अन् भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी चौकाची गेल्या २० वर्षांपासून स्वच्छता करणार्या स्वच्छता कर्मचारी मीना रमेश रुईकर यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. सायंकाळी युद्धकलांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, सर्वश्री संभाजी साळुंखे, उदय भोसले, अवधूत भाट्ये, अमोल माने यांसह अन्य उपस्थित होते.