माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा भाजपमध्ये पुनर्प्रवेश

बाळासाहेब सानप यांचा भाजपमध्ये पुनर्प्रवेश

मुंबई – नाशिक येथील माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी २१ डिसेंबर या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला. नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयामध्ये झालेल्या या पक्षप्रवेशाच्या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक महापालिकेतील भाजपचे पहिले महापौर म्हणून बाळासाहेब सानप यांनी कामकाज पाहिले आहे. ते गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

वर्ष २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपकडून निवडून आले. वर्ष २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून विधाससभेची निवडणूक लढवली; मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ४ दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन काही नेत्यांमुळे पक्ष सोडत असल्याचे सांगितले होते.