मेट्रो कारशेडच्या प्रश्नाविषयी आवश्यकता भासल्यास शरद पवार पंतप्रधानांशी चर्चा करतील ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांक मंत्री
मुंबई – मेट्रो कारशेडविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली. यामध्ये आवश्यकता भासल्यास शरद पवार १-२ दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील, अशी माहिती अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.
या वळी नवाब मलिक म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत शरद पवार यांनी ‘यामध्ये कुठेतरी एकोपा निर्माण करायला पाहिजे’, असे मत व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वाद सोडून यावर मार्ग निघाला तर पहायला हवे’, असे मत व्यक्त केले. यामध्ये पहिल्यापासून आमची भूमिका सामंजस्याची आहे; पण काही लोक यात राजकारण करत आहेत.’’