(म्हणे) ‘मोदी त्यांच्या पत्नीसमवेत ५ दिवसही राहिले नसल्याने ते देशावर शासन करण्यास असमर्थ !’ – तमिळनाडूतील ख्रिस्ती बिशप एजरा सरगुनम यांची अश्लाघ्य टीका
|
चेन्नई (तमिळनाडू) – पंतप्रधान नरेंद्र मोदी देशावर शासन करण्यास असमर्थ आहेत; कारण ते त्यांच्या पत्नीसह ५ दिवसही राहिले नव्हते, अशी अश्लाघ्य टीका तमिळनाडूतील बिशप आणि द्रमुकचे समर्थक असलेले एजरा सरगुनम यांनी केली. द्रमुकचे प्रमुख एम्.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली आयोजित कृषी कायद्याच्या विरोधातील उपोषणामध्ये बिशप एजरा यांनी भाग घेतला होता. तेव्हा ते बोलत होते.
१. एजरा पुढे म्हणाले की, मोदी स्वतःचे डोके न पालटणारी व्यक्ती आहे. ती एक अशी व्यक्ती आहे जी देशाला लुटण्यासाठी आली आहे आणि हे काम ती योग्य प्रकारे करत आहे. त्यांचे कर्तव्य ४ श्रीमंतांना समर्थन करण्याचे आहे. ते गरिबांची काळजी करत नाहीत. ते म्हणतात, ‘मी गरीब घरात जन्माला आलो आहे आणि चहा विकला आहे.’ प्रत्यक्षात मात्र ते गरिबांच्या विरोधात काम करत आहेत. मी त्यांना घाबरत नाही; कारण त्यांच्याकडे विवेक नाही. ते त्यांच्या पत्नीसमवेत कमीत कमी ५ दिवस तरी राहिले असते, तर त्यांना जीवनातील कठीण समस्यांची माहिती झाली असती. जोपर्यंत मोदी यांना हटवले जात नाही, तोपर्यंत आपल्याला समस्या येतच रहाणार आहेत. आपल्या सर्वांना हे सर्व नष्ट होण्यासाठी प्रार्थना केली पाहिजे.
“Modi could not live with his wife even for five days, How will he rule the country,” says Anti-Hindu propagandist Bishop Ezra Sargunamhttps://t.co/ICZ4t8r5tE
— OpIndia.com (@OpIndia_com) December 20, 2020
२. बिशप एजरा यांनी यापूर्वीही वादग्रस्त विधाने केली होती. वर्ष २०१९ मध्ये त्यांनी म्हटले होते की, हिंदु धर्म नावाचा कोणताही धर्म नव्हता. हिंदूंच्या कानफटात मारल्यावर रक्त येऊ दे; मग त्यांना ख्रिस्ती धर्माचे वास्तव लक्षात येईल.