५६ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) हिने श्रीविष्णूवर आधारित नृत्यप्रकार करतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे
‘५६ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) श्रीविष्णूवर आधारित नृत्यप्रकार करतांना लावलेले पार्श्वसंगीत, तिचे हावभाव आणि नृत्यातील मुद्रा पाहून माझा भाव जागृत होत होता. नृत्यातून श्रीविष्णूचे दशावतार साकारतांना ‘प्रत्येक अवताराचे रूप समोर साकारले जात आहे’, असे वाटत होते. तिने हा नृत्यप्रकार ५ वेळा करूनही मनाचे समाधान होत नव्हते. हा नृत्यप्रकार सादर करत असतांना आम्हा सर्वांच्याच मनात ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाच्या वेळेस हा नृत्यप्रकार सादर करायला हवा’, असा विचार आला. कु. अपालाने हा नृत्यप्रकार भावस्थितीत सादर केल्यामुळे आमच्यातही भाव निर्माण होण्यास साहाय्य होऊन आम्हाला होणार्या त्रासाकडे आमचे दुर्लक्ष झाले.’
– कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |