हानीभरपाई न दिल्यास धरणे आंदोलन छेडण्याची ऊस उत्पादकांची चेतावणी
सांगे, २० डिसेंबर (वार्ता.) – धारबांदोडा येथील साखर कारखाना बंद असल्याने ऊस उत्पादकांना मोठी हानी सोसावी लागत आहे. कारखाना बंद असल्याने उत्पादकांचे उसाचे पिक नष्ट होत आहे. शासनाने ऊस उत्पादकांना प्रतिटन ३ सहस्र ६०० रुपये हानीभरपाई देण्याचे लेखी आश्वासन पुढील १० दिवसांत न दिल्यास ऊस उत्पादक तालुक्याच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडणार आहेत. येथे झालेल्या ऊस उत्पादकांच्या बैठकीत ही चेतावणी देण्यात आली.