जलद आनंदप्राप्तीसाठी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करा !

जीवनातील शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक यांसारख्या ८० टक्के समस्यांमागील मूळ कारण ‘आध्यात्मिक’ असते. म्हणजेच समस्येमागील कारण वरकरणी स्थूल किंवा भौतिक वाटत असले, तरी त्यामागे प्रारब्ध, पूर्वजांचा त्रास, वाईट शक्तींचा त्रास इत्यादी अदृश्य स्वरूपातील आध्यात्मिक कारणे असतात. या कारणांवर मात करून जीवनाचे अंतिम ध्येय, म्हणजे आनंद मिळवायचा उपाय एकच व तो म्हणजे ‘साधना’.

‘साधना’ म्हणजे ईश्‍वरप्राप्तीसाठी दररोज करावयाचे प्रयत्न. ईश्‍वराचे पृथ्वीवरील चालते बोलते रूप म्हणजे गुरु. गुरूंच्या कृपेशिवाय साधना करून ईश्‍वरप्राप्ती करणे खूप कठीण असते. याउलट गुरुकृपेच्या माध्यमातूनच ईश्‍वरप्राप्ती होणे खूप सोपे व शक्य असते. गुरुकृपा लवकर होण्यासाठी करावयाची साधना म्हणजे ‘गुरुकृपायोगानुसार साधना’.

‘गुरुकृपायोगानुसार साधना’ म्हणजे व्यष्टी आणि समष्टी साधना यांचा सुयोग्य समन्वय !