शिवप्रताप
२१ डिसेंबर २०२० या दिवशी ‘शिवप्रतापदिन’ आहे. यानिमित्ताने…
हिंदवी स्वराज्यावरी अफझलखान आला चालून ।
खुणावले महाराजांना तुळजापुरीचे मंदिर पाडून ॥
या घोर संकटी भक्ता तारण्या आई भवानी आली धावून ।
सांगितला मार्ग विजयाचा स्वप्नी दृष्टांत देऊन ॥
आला प्रतापगडी खान मनी शिवहत्येचा बेत करून ।
केली सिद्ध योजना शिवरायांनी अफझल्या सह्याद्री आणून ॥
भक्ती-शक्ती-युक्तीने दाखवला कोथळा काढून ।
‘हर हर महादेव’ घोषणा वीरता-पराक्रम घडवून ॥
आपण करू संकल्प या शिवप्रतापदिनी करण्या हिंदूसंघटन ।
अन् होऊ शिवपाईक या भूतलावर हिंदु राष्ट्र स्थापून ॥
छत्रपती शिवाजी महाराज यांनी श्री भवानीदेवीच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आता हिंदु राष्ट्र स्थापनेच्या भव्य कार्यास हिंदूंचे संघटन करण्या आपण सिद्ध होऊया !
– श्री. निखिल कदम, जळगाव