सातारा शहरात ४ दिवसांत २ खून
जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा !
सातारा, २० डिसेंबर (वार्ता.) – शहराजवळील पॉवरहाऊस येथे १८ डिसेंबरच्या रात्री अंडी उधार न देण्याच्या कारणावरून एकाचा खून झाला. अवघ्या ४ दिवसांत सातारा शहरात घडलेली खुनाची हा दुसरी घटना आहे. बबन गोखले असे मृत व्यक्तीचे नाव आहे. १५ डिसेंबरच्या रात्री समर्थमंदिर परिसरात तलवारीने झालेल्या आक्रमणात एकाचा खून झाला होता.
पोलीस गस्त वाढवण्याची नागरिकांची मागणीअजयकुमार बन्सल यांनी पोलिसांना विशेषाधिकार देऊन जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था कठोर करावी, संवेदनशील आणि अतीसंवेदनशील परिसरात पोलीस गस्त वाढवावी, तपासनाक्यांवर कसून तपासणी केली जावी आदी प्रकारच्या मागण्या शहरातील नागरिक करत आहेत. |