कोल्हापुरात आता ‘आरटी-पीसीआर’ चाचणी केवळ ७०० रुपयांमध्ये
कोल्हापूर – खासगी प्रयोगशाळांनी कोरोनाची चाचणी आता केवळ ७०० रुपयांमध्ये करावी, असे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. तिसर्यांदा ही दरआकारणी अल्प करण्यात आली आहे. ‘रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट’साठीही नवी दरआकारणी घोषित करण्यात आली आहे. रुग्ण प्रयोगशाळेत आल्यास ३०० आणि ३५० रुपये, एकत्रित चाचणी नमुने घेतल्यास ३५० आणि ४५० रुपये, तर रुग्णाच्या घरी जाऊन चाचणी नमुना घेतल्यास ४५० ते ५५० रुपये आकारावेत, असे शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.