सौदी अरेबियाकडून ‘मुस्लिम ब्रदरहुड’ संघटनेचा निषेध करण्यास नकार देणारे १०० इमाम आणि मौलवी यांची पदावरून हकालपट्टी

  • आतंकवादी संघटनांचा निषेध न करणारे सौदी अरेबियात इतके इमाम आणि मौलवी असतील, तर भारतात त्यांची गणतीच करता येणार नाही !
  • भारतातील आतापर्यंतच्या एकाही पक्षाने अशा प्रकारचे आवाहन इमाम आणि मौलवी यांना करण्याचे धाडस दाखवलेले नाही आणि ते पुढेही दाखवू शकतील का ?, याचीही शाश्‍वती देता येत नाही, हे लक्षात घ्या !  

रियाध (सौदी अरेबिया) – सौदी अरेबियाच्या सरकारने देशातील १०० इमाम आणि मौलवी यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. सौदी अरेबियाच्या इस्लामी प्रकरणांशी संबंधित मंत्रालयाने त्यांना या सर्वांना शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी इस्लामी आतंकवादी संघटना ‘मुस्लिम ब्रदरहुड’वर टीका करणे आणि तिचा निषेध करण्यास सांगितले होते. त्याला त्यांनी नकार दिला होता.

यात असेही इमाम आणि मौलवी आहेत जे मक्का आणि अल्-कासिम या पवित्र ठिकाणी उपदेश करतात. वर्ष २०१४ मध्येच सौदी अरेबियाने या संघटनेला ‘आतंकवादी संघटना’ घोषित करून बंदी घातली आहे.