उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिर परिसरात उत्खननात सापडले १ सहस्र वर्षे प्राचीन मंदिर !
इस्लामी आक्रमणाच्या वेळी मंदिर पाडून त्यावर भराव घातल्याची शक्यता !
उज्जैन (मध्यप्रदेश) – येथील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या महाकालेश्वर मंदिराच्या विस्ताराचे काम चालू असतांना येथील उत्खननात १ सहस्र वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर सापडले आहे. या मंदिराच्या भिंतीवर आणि दगडावर नक्षीकाम केलेले आहे. याची माहिती मिळताच पुरातत्व विभागासह विविध विभागांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे.
The structure could belong to the time of the Parmar dynasty, as the red brown basalt found during the excavation was used during that period.https://t.co/o8eZUnnT3V
— News18.com (@news18dotcom) December 20, 2020
पुरातत्व विभागाचे अधिकारी रमण सोलंकी यांनी सांगितलं की, अशाप्रकारचे अवशेष आम्हाला पहिल्यांदाच सापडले असून याप्रकारची रचना आम्ही कधीही पाहिली नाही. जेव्हा आम्ही पूर्ण खोदकाम करू तेव्हाच आम्हाला या मंदिराचा आकार कळू शकेल. हे सर्व अवशेष इल्तुतमिशच्या आक्रमणाच्या वेळेचे असल्याचे प्रथमदर्शनी वाटत आहे. याठिकाणी मंदिर पाडून त्याठिकाणी भराव घातल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. हे मंदिर परमार राजवटीच्या काळातील असून ते १ सहस्र वर्ष जुने आहे.