निरोगी नागरिक ही शहराची खरी संपत्ती ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले
सातारा – निरोगी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने सायकलचा उपयोग चालू केला पाहिजे. सर्वांनी आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवन जगावे; कारण निरोगी नागरिक ही शहराची खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. हॉटेल गुलबहार येथे सायकलपटूंचा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे म्हणाले की, सामाजिक जीवनात कार्यरत असतांना सर्वांनाच धावपळ, ताणतणाव आदी गोष्टींना सामोरे जावे लागते. मलाही काही मासांपूर्वी यामुळे त्रास झाला होता; मात्र निरोगी जीवन जगण्यासाठी मी सायकल चालवू लागलो. शहरातील प्रत्येकाने सायकल वापरायला हवी. यामुळे सर्वांचे जीवन निरोगी आणि आनंदी होऊ शकेल.