‘सनातन प्रभात’ नियतकालिके आता सुप्रसिद्ध ‘डेली हंट’ ‘न्यूज अॅप’वरही उपलब्ध !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत असलेली ‘सनातन प्रभात’ची नियतकालिके आता ‘डेली हंट’ या सुविख्यात अॅन्ड्रॉईड अॅपवरही उपलब्ध झाली आहेत. यामुळे ‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांमधील राष्ट्र-धर्माचे जाज्वल्य विचारधन, तसेच हिंदु राष्ट्राचा विचार भारतभरातील हिंदु जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे आणि परिणामकारकरित्या पोचणार आहे.
‘डेली हंट’ हे भारतातील सर्वांत लोकप्रिय ‘न्यूज अॅप’ असून ते १४ भाषांमध्ये उपलब्ध आहे. भारतासमवेतच बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका हे देश, तसेच आफ्रिका खंडातही हे अॅप वापरले जाते. या ‘अॅप’वर आता ‘सनातन प्रभात’ची सर्व भाषांमधील अर्थात् मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी नियतकालिकांमधील लेख/वृत्ते वाचता येणार आहेत.
‘डेली हंट’वर सनातन प्रभात वाचण्यासाठी वाचकांनी हे ‘अॅप’ स्वतःच्या भ्रमणभाषमध्ये डाऊनलोड करावे. अॅपमध्ये गेल्यावर आरंभीच ‘Search’चा (शोधण्याचा) पर्याय आहे. तेथे आपल्या भाषेत ‘सनातन प्रभात’ हे शब्द घालून शोधल्यास विविध पर्याय दिसतात. यामध्ये ‘सनातन प्रभात’च्या चिन्हावर ‘क्लिक’ केल्यास (दाबल्यास) त्या भाषेचे ‘सनातन प्रभात’चे पान उघडते. तेथे ‘फॉलो’ असे बटन आहे, त्यावर ‘क्लिक’ करून ‘फॉलो’ करावे. याने सनातन प्रभात संकेतस्थळावरील सर्व बातम्या, लेख आदी माहिती आपण डेली हंटवरही सहज वाचू शकता.