‘गोवा इन्क्विझिशन’चा रक्तरंजित इतिहास समोर आणण्यासाठी झालेला #GoaInquisition ‘हॅशटॅग’ राष्ट्रीय ट्रेंडमध्ये पहिल्या क्रमांकावर !

फोंडा (गोवा) – १९ डिसेंबर हा दिवस गोवा मुक्तीदिन म्हणून गोव्यामध्ये साजरा केला जातो. या दिवशी गोव्याला अत्याचारी पोर्तुगिजांपासून ४५१ वर्षांनंतर स्वातंत्र्य मिळाले. वर्ष १५६० ते १८१२ या २५२ वर्षांच्या काळात पोर्तुगिजांकडून चालवण्यात आलेल्या इन्क्विझिशनद्वारे हिंदूंना ख्रिस्ती करण्यात आले. ख्रिस्ती झालेल्या हिंदूंनी ख्रिस्ती धर्माचे पालन न केल्यास त्यांना अत्यंत अमानुष पद्धतीने शिक्षा दिली जात होती. हा इतिहास भारतियांना कधीही शिकवला गेला नाही आणि जात नाही. यावर चर्चाही केली जात नाही. १९ डिसेंबरला गोवा मुक्तीदिनानिमित्त हा इतिहास समोर आणण्यासाठी ट्विटरवर धर्मप्रेमींकडून #GoaInquisition हा हॅशटॅग करण्यात आला होता.

तो राष्ट्रीय स्तरावर पहिल्या क्रमांकावर होता. यावर ३० सहस्रांहून अधिक जणांनी ट्वीट्स केले. यात धर्मप्रेमींनी ‘या अत्याचारांसाठी पोप यांनी क्षमा मागावी, तसेच हा इतिहास शाळांमधून शिकवण्यात यावा’, अशा मागण्या केल्या.