कुडाळ बाजारपेठेत गांजाविक्री होत असल्याचे उघड करणार्यांना धमक्या देणार्यांवर कारवाईची मागणी
अमली पदार्थ माफियांची आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही दहशत !
कुडाळ – येथील बाजारपेठेत गांजासदृश वस्तू विकतांना दोघे आढळून आले होते. हे प्रकरण उघड करणार्या तरुणांना धमक्या दिल्या जात आहेत. अशा प्रकारे धमक्या देणार्यांवर तात्काळ कारवाई करा, अशी मागणी शिवप्रेमी संस्थेच्या पदाधिकार्यांनी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना निवेदन देऊन केली आहे. या प्रकरणाचा थेट संबंध कणकवली येथे असल्याचे समजते. हा प्रकार घडल्यानंतर हे प्रकरण उघड करणार्यांना धमक्या देण्याचे प्रमाण वाढले आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. या वेळी शिवप्रेमी संघटनेचे राजू दळवी, अभय जोशी, सर्वेश ठाकूर आदी उपस्थित होते.