माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भारत सरकारची ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था
कणकवली – माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना भारत सरकारची ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. यात २ अधिकार्यांसह ११ सुरक्षारक्षकांचे पथक असणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आढावा घेऊन काही नेत्यांच्या सुरक्षेत वाढ केली असून त्यामध्ये खासदार राणे यांचा समावेश आहे. सध्या खासदार राणे यांना महाराष्ट्र सरकारची ‘वाय’ दर्जाची सुरक्षा आहे.