सावंतवाडी आगारातील कर्मचार्यांना मुंबईत सेवेसाठी पाठवल्यास आंदोलन करणार ! – मनसे राज्य परिवहन कामगार सेना
सावंतवाडी – सावंतवाडी आगारातील चालक आणि वाहक यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये ‘बेस्ट’च्या सेवेसाठी पाठवू नये, अशी आमची मागणी आहे. या मागणीचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी मनसे राज्य परिवहन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अधिवक्ता राजू कासकर आणि कार्याध्यक्ष संतोष भैरवकर यांनी येथील आगार व्यवस्थापकांना दिली आहे.
याविषयीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कुडाळ आगारातून मुंबई येथे गेलेल्या एस्.टी.च्या २० कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित सर्व कर्मचारी मुंबईत सेवा देऊन आले आहेत. याचा त्रास त्यांच्या कुटुंबियांना सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकारामुळे त्यांची स्थिती बिकट झाली आहे. सावंतवाडीतही कोरोनाचे रुग्ण घटत असतांना आगारातील कर्मचार्यांना मुंबईला पाठवून येथील संकटाला वाव देऊ नका.