ज्येष्ठ नागरिकांना विविध सेवा पुरविणार्या ‘केअर टेकर एजन्सी’वर पोलिसांची नजर ! – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता
पुणे – ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवणार्या काही ‘केअरटेकर एजन्सी’ अपप्रकार करत असल्याचे आढळले आहे. त्यांचा शोध घेऊन, त्यांची सखोल चौकशी करून दोषी असणार्या एजन्सीवर कडक कारवाई करणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले. शहरातील एका वृत्तपत्र कार्यालयास भेट देऊन त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला.
त्या वेळी त्यांनी सायबर गुन्हे आणि आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगून शहरातील कायदा अन् सुव्यवस्था राखण्याबरोबरच शहरातील गुन्हेगारी न्यून करण्यासाठीही प्रयत्न करीत आहे, असे सांगितले. गुटखा विक्री आणि घोड्यांच्या शर्यती वरील अनधिकृत बेटिंग (पैजा) लावणार्यांवर कारवाई करण्याबरोबरच गुन्हेगारांना शोधण्यासाठी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवत असल्याचेही सांगितले.